नवं सरकार नवे मंत्री
|जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या भारत देशाला १५ वे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने मिळाले. .
लोकसभा निवडणुकीत न भूतो विजय मिळवलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) सरकारने नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी सायंकाळी देशाचा कारभार हाती घेतला.
राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या दिमाखदार समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी शपथ घेतली.
नवीन सरकार आणि नवीन मंत्र्यांची नावे आणी पदे खालीलप्रमाणे :-
नरेंद्र मोदी (पंतप्रधान)
नितीन गडकरी (रस्ते वाहतूक व जहाजबांधणी)
राजनाथसिंह (गृह मंत्रालय)
सुषमा स्वराज (परराष्ट्र मंत्रालय)
अरुण जेटली (अर्थ, कार्पोरेट अफेयर्स आणि संरक्षण)
डी.व्ही. सदानंद गौडा (रेल्वे)
नजमा हेपतुल्ला (अल्पसंख्यांक)
रामविलास पासवान (अन्न, ग्राहक संरक्षण)
गोपीनाथ मुंडे ( ग्रामविकास)
प्रकाश केशव जावडेकर (माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री)
रविशंकर प्रसाद (कायदा व बालकल्याण)
ज्युऐल ओराम (आदिवासी विकास मंत्रालय)
स्मृती इराणी ( मनुष्यबळ विकास)
रावसाहेब दादाराव पाटील दानवे (ग्राहक संरक्षण, अन्न राज्यमंत्री)
व्यंकय्या नायडू (संसदीय कामकाज, नगर विकास, गृह निर्माण)
डॉ. हर्षवर्धन (आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री)
राधा मोहन सिंग (कृषी)
पीयूष गोयल (उर्जा राज्य मंत्री)
अनंतकुमार ( रसायन आणि खत)
नरेंद्रसिंग तोमर (कामगार व रोजगार, स्टील मंत्रालय)
कलराज मिश्र (लघु उद्योग मंत्री)
हरसिमरत कौर-बादल (अन्न प्रक्रिया मंत्रालय)
मेनका गांधी (महिला व बालकल्याण मंत्री)
अशोक गजापती राजू (नागरी उड्डाण मंत्री)
अनंत गीते (अवजड उद्योग)
तवरचंद गेहलोत (सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय)
उमा भारती (जलसंपदा, गंगा स्वच्छता अभियान)
श्रीपाद यासो नाईक (सांस्कृतिक व पर्यटन ( स्वतंत्र प्रभार)