नवजात बाळाची अशी घ्या काळजी..

   index  प्रत्येक जोडप्याच्या वैवाहिक जीवनातील सर्वात सुखद क्षण असतो त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत! सध्याच्या काळात नोकरी-व्यवसायानिमित्त मुलांना आई-वडिलांपासून दूर राहावे लागते. अशातच लग्न झाल्यानंतर बाळ येण्याच्या सुखद क्षणी वडिलधारे जवळ असतीलच असे नाही. मात्र त्यांची उणीव जरूर भासते. ‘काय करावे, काय करू नये’ असे प्रश्न सतावतात. म्हणूनच बाळ जन्मल्यावर त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शक सूचना पुढे देत आहोत,      

     बाळास जन्मानंतर किमान २४ तासांनंतरच आंघोळ घालावी.बाळ जन्मल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत मातेने बाळासस्तनपान करावे. हे माता आणि बाळ या दोघांसाठी  हितकारक आहे. मातेला प्रसूतीनंतर रक्तस्त्राव टाळण्यास
मदत होते, तसेच सुरुवातीच्या दुधातून बाळाचीप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.पहिले चार महिने बाळास निव्वळ स्तनपान केल्यासबाळाच्या कुपोषणासह इतर आजार नियंत्रणात राहतात.जन्मल्यानंतर बाळास तोंडावाटे कोणत्याही प्रकारचे द्रव्य, मध आदी देऊ नये. भेसळयुक्त पदार्थांमुळे बाळाचे आरोग्यबिघडू शकते.
नवजात बालकांचे लसीकरण काळजीपूर्वक करून घ्यावे.

2 Comments