नवरतन कुर्मा

साहित्य :-navratan korma

१)      अर्धी वाटी गाजराचे लहान तुकडे

२)     अर्धी वाटी फरसबीचे लहान तुकडे

३)     अर्धी वाटी हिरवे वाटाणे , ह्या भाज्या उकडून घ्याव्यात .

४)     एक वाटी अननसाचे लहान तुकडे

५)    अर्धी वाटी सफरचंदाचे साले काढून लहान तुकडे

६)      पाव वाटी काजूचे तुकडे

७)    पाव वाटी अक्रोडचे तुकडे

८)     मलई , व्हाईट ग्रेव्ही

९)      पाव वाटी बेदाणे , साखर

१०)  खडा गरम मसाला , मीठ

११)   दोन टेबल स्पून तूप . 

कृती :-

१)      एक कांदा चांगला परतून घ्यावा .  त्यात उकडलेल्या भाज्या व ड्राय फ्रुट टाकावे . 

२)     दोन लवंग , दोन दालचिनीचे तुकडे , दोन वेलच्या त्या मिश्रणात टाकाव्यात .

३)     थोडेसे पाणी टाकून चवीला साखर , मीठ टाकणे .  दोन टेबल स्पून व्हाईट         ग्रेव्ही टाकावी .  अर्धा चमचा मावा व एक चमचा मलई टाकावी .  वरून त्यात     कोथिंबीर टाकावी .