नवा जिल्हा पालघर…

palghar
एक कोटी लोकसंख्या आणि ९ हजार ५५८ चौ . किमीचे प्रचंड क्षेत्रफळ अशा राज्यातल्या सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला अखेर मुहूर्त सापडला आहे . जिल्हा विभाजनाची प्रक्रिया सुरू असून १ मे रोजी त्याबाबतची घोषणा होईल , अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी विधानसभेत दिली . गेल्या वर्षी सर्वेक्षण व जनमत चाचणीसाठी सरकारने नेमलेल्या कोकण विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखालील समितीच्या शिफारशीवर राज्य सरकारने शिक्कामोर्तब.
नव्या पालघर जिल्ह्याचे क्षेत्रफळ ( ५७६६ चौ . किमी ) हे विभाजनानंतर शिल्लक राहिलेल्या ठाणे जिल्ह्यापेक्षा ( ४२४१ चौ . किमी ) जास्त असले तरी ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ( ८० लाख ५८ हजार ) पालघरपेक्षा ( २९ लाख ९५ हजार ) अडीच पट जास्त आहे . तरीही डहाणू विक्रमगड , पालघर , बोईसर , वसई , नालासोपारा हे विधानसभेचे सहा मतदारसंघ पालघर जिल्ह्यात जाणार आहेत . तर , ठाणे जिल्ह्यात ठाणे , भिवंडी , कल्याण असे लोकसभेचे तीन आणि ठाणे , कोपरी – पाचपाखाडी , ओवळा – माजीवाडा , मुंब्रा , ऐरोली , बेलापूर , भाईंदर , डोंबिवली , कल्याण पूर्व , कल्याण पश्चिम , कल्याण ग्रामीण , भिवंडी पूर्व , भिवंडी ‌ पश्चिम , भिवंडी ग्रामीण , अंबरनाथ , उल्हासनगर , मुरबाड , शहापूर हे विधानसभेचे १८ मतदारसंघ असतील . ठाणे जिल्ह्यातील मतदारसंख्या ( सन २००९ च्या मतदार यादीनुसार ) ५० लाख ८० हजार १०९ इतकी असून पालघर जिल्ह्यात १६ लाख २२ हजार ३८९ मतदार आहेत .