नवीदिशा

सध्या अनेक प्रकारचे नवीन newअभ्यासक्रम सुरू झाले आहेत. त्यामध्ये नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटर, प्रोग्रामर, सॉफ्टवेअर टेस्टर, डेटाबेस अँडमिनिस्ट्रेटर तसेच हार्डवेअर इंजिनीअर अशा अभ्यासक्रमांचा समावेश होतो. कंपनी छोटी असो वा मोठी, त्यात नेटवर्किंग आवश्यक ठरते. त्या दृष्टीने नेटवर्क अँडमिनिस्ट्रेटरचे महत्त्व मोठे आहे. या क्षेत्रात नेटवर्कमधील सिक्युरिटीबाबत माहिती दिली जाते. याप्रमाणेच कॉम्प्युटर प्रोग्रामर या पदावरील व्यक्तींनाही महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या कामाचे विश्लेषण करण्याची जबाबदारी सॉफ्टवेअर टेस्टरला पार पाडावी लागते. यात अँप्लिकेशन गेम्सच्या सॉफ्टवेअरच्या तपासणीचाही समावेश होतो. साहजिक या क्षेत्रात कारकिर्दीच्या व्यापक संधी आहेत. डेटाबेस अँडमिनिस्ट्रेटर हे असेच महत्त्वाचे पद आहे. त्यामध्ये हार्डवेअर किंवा रोबो तयार करणे, डाटा कम्युनिकेशनसाठी डिझाईन तयार करणे, नेटवर्कची देखभाल करणे, वेबसाईट व्यवस्थित राहील हे पाहणे तसेच त्यात योग्य तो डाटा साठवून ठेवणे या कामांचा समावेश होतो. इंटरनेटच्या वापरासंदर्भातील काही समस्यांबाबत कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्याची संधी सायबर लॉमध्ये मिळते. यामध्ये क्रेडिट कार्ड हॅकिंग, बिझनेस ट्रान्झक्शन आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डबाबतची माहितीही घेता येते. प्रॉपर्टी लॉ, कॉपीराईट, सॉफ्टवेअर पेटंट तसेच नेटबँकिंग संदर्भातील खटले लढण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मोलाची मदत होऊ शकते. या क्षेत्रात सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे वीस हजार रुपये मासिक वेतन प्राप्त होऊ शकते. सध्या ग्राफिक डिझायनिंगच्या क्षेत्रात कारकिर्दीच्या व्यापक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करून नोकरी करता येतेच शिवाय फ्रीलान्सिंग कामाचा पर्यायही उपलब्ध आहे. या सार्‍या बाबी लक्षात घेऊन बदलत्या काळाची गरज म्हणून अशा अभ्यासक्रमांचा अवश्य विचार करायला हवा.