नारळाच्या चटणी
|१) एक वाटी ओलं खोबरं
२) चार-पाच लाल बेडगी मिरच्या
३) एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
४) अर्धा चमचा जिरं
५) चवीला साखर
६) एक मोठा चमचा तूर
७) पाव चमचा उडदाची डाळ
८) चार-पाच कढीलिंबाची पानं
९) फोडणीसाठी मोहरी , हिंग
१०) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) तेल तापवून त्यात मोहरी घालावी . ती तडतडली की उडदाची डाळ , कढीपत्ता घालावा .
२) डाळ लालसर झाली की हिंग आणि लाल मिरच्या घालून खाली उतरवावं .
३) बाकीचे सर्व पदार्थ आणि फोडणीतल्या लाल मिरच्या एकत्र करून बारीक वाटावं आणि फोडणी घालून चटणी कालवावी .