निगा केसांची

hair-care-tipsकेसांचे आरोग्य राखण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. प्रदूषण आणि प्रखर प्रकाशापासून रक्षण केल्यास केसांचे आरोग्य जपले जातेच पण त्यासाठी आहारातही काही घटकांचा आवर्जुन समावेश करायला हवा. यादृष्टीने आंबट फळांचे सेवन योग्य ठरते. आहारात संत्र, द्राक्ष, लिंबू यांचा समावेश असल्यास केसांचे आरोग्य राखण्यास मदत होते. केसांच्या आरोग्यासाठी जांभूळही लाभकारक आहे. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए चे प्रमाण सर्वाधिक आहे हे आपण जाणतोच. याचा डोळय़ांच्या आरोग्यासाठी लाभ होतो तसेच केसांच्या आरोग्यासाठीही लाभ होतो. गाजरातील लाभकारक घटकांमुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणार्‍या नैसर्गिक तेलाच्या निमिर्तीची प्रक्रिया वेगवान बनते. बदाम, आक्रोड अशा मेव्याचे सेवनही केसांसाठी लाभकारक आहे. बदामाच्या तेलात २-३ चमचे दूध मिसळून मसाज केल्यास केसांची बळकटी वाढते. मधातल्या लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, सोडियम, व्हिटॅमिन बी-१२ मुळेही केसांचे आरोग्य सुधारते.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *