निगा राखा दातांची

teethजेवल्यानंतर दात घासणे ही खरंच चांगली सवय आहे का? ..जेवल्यानंतर दात तर घासलेच पाहिजेत पण लगेच नाही. डेंटिस्टच्या मते जेवणानंतर लगेच दात घासल्याने दात कमकुवत होतात. जेवणादरम्यान तोंडात बर्‍याच रासायनिक क्रिया होत असतात. त्यात लगेचच दात घासले तर हिरड्यांना त्रास होतो. त्यामुळे जेवणानंतर किमान ३0 मिनिटांनी दात घासावे. यामुळे तोंडातील लाळेला जेवणातून तयार होणारं अँसिड पचवायलाही पुरेसा अवधी मिळतो. काही खाल्ल्यानंतर सतत दात घासण्यापेक्षा चूळ भरावी. हात धुण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करणं हीसुद्धा तितकीशी चांगली सवय नाही.  संशोधनानुसार बहुतांशी सॅनिटायजरमध्ये असणारं ट्रायक्लोसन नावाचं रसायन त्वचेला इजा पोचवतं. इतकंच नाही तर अतिवापराने त्वचारोग किंवा नपुसंकत्व असे गंभीर आजार होण्याचाही धोका असतो.