नितीश कुमार ह्यांचा राजीनामा
|लोकसभा निवडणुकीतील जनता दलाच्या (युनायटेड) दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नितीश कुमार यांनी शनिवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
नितीश यांच्या राजीनाम्यानंतर जदयुने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध चालवला आहे.
त्यासाठीच रविवारी ४ वाजता जदयुने विधिमंडळ पक्षाची बैठक बोलवली आहे. नितीश यांनी जदयुच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते.
तथापि, बिहारमधील ४0 जागांपैकी केवळ दोन जागा त्यांना मिळाल्या. २४ उमेदवारांची तर अनामत रक्कमही जप्त झाली.
पक्षाची अशी धूळधाण झाल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल डी.वाय. पाटील यांच्याकडे पाठवून दिला.
राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल जदयुसाठी निराशाजनक राहिले. जनमताचा कौल मान्य करून मी आणि माझ्या मंत्रिमंडळाने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
मी पक्षाच्या प्रचारमोहिमेचे नेतृत्व केले. त्यामुळे या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारणे माझे कर्तव्य आहे.,
असे त्यांनी राजीनाम्यानंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.