नियोजन सहलीचे

tripदेशाटन करावे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते.  सहलीचा खर्च कमी करायचा असेल तर नियोजन असायलाच हवं. आगाऊ बुकिंग केल्यास खर्चात बरीच कपात होऊ शकते. ठरावीक दिवस आधी बुकिंग केल्यास लक्झरी हॉटेलमधल्या ऑफर्सचा फायदा मिळवता येतो. एक महिना आधी रेल्वे किंवा विमानाचं तिकीट काढल्यास पैसेही वाचतात आणि विनाकारण धावपळही होत नाही. ‘मेक माय ट्रिप’, ‘यात्रा’, ‘ट्रॅव्हलसिटी’ यांसारख्या वेबसाईटवरून हॉलिडे पॅकेजची माहिती घेता येईल. इथे ऑनलाइन बुकिंग करण्याचीही सोय असते. अशा ऑफर्सद्वारे जवळपास २0-३0 टक्के फायदा मिळू शकतो. भारतीय रेल्वेही प्रवाशांसाठी अनेक सवलती उपलब्ध करून देत असते. याचीही माहिती घ्यावी, असे नियोजन असल्यास कमीत कमी खर्चात बरीच ठिकाणे पाहण्याचे स्वप्न पूर्ण होईल.