निरोगी दीर्घायुष्यासाठी

health‘साखरेचं खाणार त्याला देव देणार’ ही म्हण आपण आतापर्यंत ऐकत होतो. मात्र आता ‘साखरेचं खाणार त्याला आजार मिळणार’ अशी नवी म्हण रूढ होतीये. कुठलेही उपचार घेताना डॉक्टर आधी आहारातील साखरेचे प्रमाण कमी करायला सांगतात. मधुमेहाचे प्रमाण वाढत असताना ही काळजी घ्यायलाच हवी. टाईप १ प्रकारचा मधुमेह असण्याचा आणि साखर खाण्याचा अर्थाअर्थी संबंध नाही. कारण रुग्णांना जन्मत:च ही व्याधी जडलेली असते. मात्र, टाईप २ मधुमेह टाळायचा असेल तर साखरेच्या सेवनावर नियंत्रण हवे. फळांच्या सेवनाद्वारे शरीरात जमा होणारी नैसर्गिक शर्करा मधुमेहास कारणीभूत ठरत नाही, असा आतापर्यंतचा विचार होता. मात्र संशोधकांच्या मते मधुमेह असताना अतिरिक्त प्रमाणात फळांचे सेवन होत असेल आणि त्याद्वारे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असेल तर तेही घातक आहे. डायबेटीस किंवा प्रीडायबेटीससाठी डॉक्टर ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट करायला सांगतात. या टेस्टमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अभ्यासले जाते. संशोधकांच्या मते कुठल्याही सामान्य पेयातील ग्लुकोजची ७५ ग्रॅम मात्राही शारीरिक यंत्रणेवर दबाव टाकते. म्हणूनच निरोगी दीर्घायुष्यासाठी रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवायला हवे.