नैराश्य टाळायचे – पाळा प्राणी

petsएकटेपणा घालवण्याचा आणि नैराश्य टाळण्याचा खात्रीशीर उपाय म्हणजे पाळीव प्राण्यांशी मैत्री.

मुलांना आवडतात म्हणून घरात प्राणी पाळले जातात. पण आपल्याला आवडतात म्हणूनही पाळीव प्राणी पाळायला हरकत नाही. हे मुके जीव तुमची सोबत करण्यास सतत तयार असतात. आनंद, दु:ख, व्यथा, वेदना या सगळ्या भावनांना प्रतिसाद देत तुमचे सखे बनून राहतात.

कुत्रा हा प्राणी सगळ्यांनाच प्रिय. तुमच्या भावना जाणणारा, त्या ओळखून तुम्हाला प्रफुल्लित करणारा, तुमचं एकटेपण दूर करणारा, तुमच्या व्यथा वेदना निमूटपणे ऐकून घेणारा, ताणामुळे होणारा त्रागा सहन करणारा हा तुमचा जीवलग होऊ शकतो.

घरात एखादा पाळीव प्राणी असेल तरी तणाव कमी होतो, असं अभ्यासाअंती सिद्ध झालं आहे.  त्याला यापेक्षा तुमच्याकडून काहीच नको. पण बदल्यात त्याच्याशी जुळणारी मैत्री मात्र अमूल्य आहे.

एवढीही तसदी घ्यायची नसेल तर मांजर पाळण्याचा निर्णय घ्या.  हेही नको असेल तर रंगीबेरंगी मासे पाळा. हे मुके जीव तर अगदीच साधे. अतिशय स्वस्तात मिळणारं खाद्य पुरवणं आणि नियमितपणे पाणी बदलणं एवढं पथ्य पाळलं तर त्यांच्यासारखी सोबत नाही. त्यांच्या वेगानं होणार्‍या हालचाली न्याहाळणं, ते मोठं होताना बघणं वेगळाच आनंद देऊन जाणारं आहे.