न प्रदर्शित झालेला चित्रपट…..TV वर

anirअभिनय क्षेत्रात आपल्या अनोख्या शैलीसाठी आणि उत्तम कलाकार म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे अमीर .जेव्हा आमिर खानचा चित्रपट चित्रपटगृहात झळकतो तेव्हा चित्रपटगृहाच्याबाहेर चाहत्यांच्या तिकीट खिडकीवर लांबच लांब रांगा लागलेल्या नजरेस पडतात, तसेच सर्वत्र हाऊसफुलचे फलक झळकलेल दिसतात. धूम-३ हे याचे ताजे उदाहरण आहे, ज्याने बॉक्स ऑफीसवरचे सर्व रेकॉर्ड मोडले. गेले काही दिवस चर्चेत असलेले वृत्त म्हणजे अद्याप प्रदर्शित न झालेला आमिर खानचा चित्रपट, फरक एव्हढाच आहे की यावेळी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर न झळकता टीव्हीवर प्रदर्शित होणार आहे. जूनच्या ८ तारखेला रविवारी संध्याकाळी ८ वाजता ‘अॅण्ड पिक्चरवर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेम, हणामारी, नाट्य असा फिल्मी मसाला ठासून भरलेला आहे. चित्रपटच्या टीव्हीवरील प्रदर्शनाच्यावेळी ब्रेकदरम्यान आमिर खान दूरध्वनीद्वारे चाहत्यांशी थेट संपर्क साधून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. भारतभरातून निवडल्या जाणाऱ्या भाग्यवान विजेत्याला आमिर खानबरोबर चित्रपट पाहाण्याची संधीदेखील मिळणार आहे.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *