पनीर-चीज सॅन्डविच

साहित्य :-Cheese Sandwich Pakoda

१)      एक वाटी पनीर

२)     अर्धी वाटी किसलेलं चीज

३)     एक चमचा आलं-लसूण-मिरची वाटून

४)     पाव वाटी बारीक चिरलेली कोथिबीर

५)    मीठ-मिरपूड

६)      सात-आठ ब्रेड स्लाईस

७)    पाव वाटी टोमाटो सॉस

८)     थोडं लोणी . 

कृती :-

१)      ब्रेडच्या स्लाईसना एका बाजूनं टोमाटो सॉस लावावा .  पनीर कुस्करून घेऊन त्यात इतर साहित्य मिसळावं . 

२)     निम्म्या ब्रेड स्लाईसवर हे मिश्रण पसरून वर उरलेले स्लाईस लावून त्याचे सॅन्डविच तयार करावेत . 

३)     वाटल्यास बाहेरच्या बाजूनं लोणी लावून नॉनस्टीक तव्यावर भाजावेत किंवा सॅन्डविचमेकर , ओव्हनमध्ये भाजावेत .  लोणी न लावताही तसेच भाजून    कापून घेता येतात .