परंपरा भेटवस्तूची

Diwali-gifts1दिवाळीनिमित्त एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आपल्याकडे संस्कृती म्हणून जपली जाते. भेटवस्तू छोटी का मोठी याचे मोल नसते, ती ज्याला द्यावयाची असते, त्या व्यक्तीचे, नात्याचे मोल अमूल्य असते. म्हणूनच भेट म्हणून निवडावयाची वस्तू चोखंदळच निवडावी.
दिवाळीनिमित्तच्या भेटवस्तूंनी बाजारपेठ सजली आहे. ग्लास, वूडन, मोती, मेटल यापासून बनविलेल्या भेटवस्तूंबरोबर सोन्या, चांदीच्या किंमती दागिन्यांची भेट देऊनही आपल्या माणसांना खूश केले जाते. याकरिता सराफ बाजारात अनेक कंपन्यांनी खास भेट देण्याकरिता म्हणून अनेक छोट्या पण मौल्यवान वस्तूंची निर्मिती केली आहे. गिफ्ट शॉपीमध्ये चक्कर मारली असता लक्षात येईल की, आपापल्या आवडीनुसार असंख्य व्हरायटी बजेटमध्ये उपलब्ध आहेत.
भेटवस्तू देण्यात परफ्यूमची पसंती आाघडीवर आहे. याशिवाय दिवाणखान्यातल्या शो केसमध्ये दिमाखात झळकतील, अशा अनेक वस्तूंची बाजारात रेलचेल आहे. गिफ्ट देताना कोणाला देणार आहोत, नाते, वय, देणार्‍याचा स्वभाव, आवड याची नोंद घेत अशी भेट द्या की, जी दिल्याने देणारा आणि घेणारा सुखावून जाईल.

Add a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *