पाटवड्यांची भाजी
|साहित्य :-
१) हरभरा डाळीचं पीठ दीड वाटी
२) तिखट अर्धा चमचा
३) ओवा एक चमचा
४) धणेपूड सव्वा चमचा
५) जिरेपूड एक चमचा
६) सांबार मसाला एक चमचा
७) चिंचेचा कोळ एक मोठा चमचा किंवा तीन-चार आमसुलं
८) गुळ एक मोठा चमचा
९) चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
१०) कढीपत्ता तीन-चार पानं
११) तेल अर्धी वाटीपेक्षा जास्त
१२) फोडणीचं साहित्य , खोबऱ्याचा कीस पाव वाटी , चवीनुसार मीठ .
कृती :-
१) फोडणी करून त्यात एक वाटी डाळीचं पीठ खमंग भाजून घ्यावं आणि त्यात मीठ , तिखट घालून थोडं थोडं पाणी घालत अगदी घट्टसर पिठल्यासारखं करावं .
२) मिश्रण कडेनं सुटू लागलं म्हणजे एका ताटाला तेलाचा हात लावून घ्यावा व वरील मिश्रण त्यावर थापावं .
३) एकसारखं थाप्ल्यावर त्यावर किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर पेरावी व मोठया मोठया चौकोनी वड्या कापून घ्याव्या .
४) वड्या थंड झल्यावर त्या एका भांड्यामध्ये काढून घ्याव्यात . वर दिलेल्या चुबकवडीच्या भाजीप्रमाणे घट्टरस्सा करून तो वेगळा व गरम , उकळता ठेवावा .
५) आंबट गोड हवा असल्यास तसा करावा किंवा आंबट-गोड न घालताही झणझणीत छान लागतो .
६) ही भाजी वाढताना आधी दोन वड्या ठेवून त्यावर रस्सा घालावा व खोबरं-कोथिंबीर पेरून किंवा आवडीप्रमाणे सुशोभित करावं . (ही भाजी मोकळ्या भाताबरोबर , लोणच्याच्या साथीनं सुंदर लागते .)