पाणी पिताय ना?

drinkingआजकाल धावत्या युगातही काही जण कटाक्षाने आपल्या शरीराकडे, तसेच तब्येतीकडे विशेष लक्ष देताना दिसतात, पण हे सगळं करत असताना काही साध्या-साध्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. याचेच उदाहरण म्हणजे पाणी. दिवसभरात तुम्ही किती पाणी पिता आणि त्यामुळे तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.

पहाटे उठल्यावर एक ग्लासभर पाणी पिणे कधीही योग्य असल्याचे सांगितले जाते. यामुळे तुमची त्वचा कोरडी पडत नाही. सकाळी कोमट पाणी प्यायल्याचाही फायदा होतो. त्यात मध किंवा लिंबू टाकून प्यायल्यास शरीरातील टॉक्सिक एलिमेंट बाहेर टाकण्यास मदत होत असते. अतिशय जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यास आरोग्याला धोकादायक असते, पण जास्त प्रमाणात कमी पाणी प्यायल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्याची उदाहरणेही आहेत. कोमट पाणी, लिंबू पाणी प्यायल्याने एनर्जीची लेव्हल वाढते आणि पचन क्रिया उत्तम राहण्यास मदत होते. पाणी प्यायल्याने शरीरातील जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते. कोमट पाणी प्यायल्यास पित्त आणि कफ दोष होत नाही.

जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे, पाणी लगेच प्यायल्यास जेवण पचण्यास वेळ लागतो, काकडी, खरबूज आणि आइस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. सर्दी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. जेवणानंतर लगेच पाणी प्यायल्याने फॅट वाढतात. सो, मग तुम्ही व्यवस्थित पाणी पिताय ना?