पावसाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी

आपण सगळे जास्त करून उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी या बद्दल जास्त जागरूक असतो परंतु असे नाहीये सर्व ऋतू मध्ये त्वचेवर वेगवेगळे परिणाम होत असतात.

पावसाने जोर धरला आहे त्यामुळे सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाळा आणि निसर्गरम्य परिसर सर्वांना भुरळ घातल असला तरी पावसाळा म्हणजे आजारी पडणे हे सामान्य आहे. परंतु जास्त वेळा आजारी पडणे म्हणजे आपली रोग प्रतिकार क्षमता कमी आहे असा त्याचा अर्थ होतो.

म्हणून पावसाळा आला कि प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही आरोग्यदायी हेल्थ टिप्स फॉलो केल्या पाहिजे. या दिवसांत आरोग्याप्रमाणेच त्वचेचीदेखील विशेष काळजी घेण्याची गरज असते. कारण हवामानामध्ये होणाऱ्या बदलांचा त्वचेवर परिणाम होत असतो.

पावसात भिजल्यामुळे अथवा रस्त्यावरील साठलेल्या पाण्यातून फिरण्याने तुम्हाला त्वचा समस्या निर्माण होऊ शकतात. पावसात हवामानामध्ये दमटपणा वाढलेला असतो. असे वातावरण जीवजंतूसाठी पोषक असते.

सहाजिकच अशा वातावरणात जंतूसंसर्ग झाल्यास तुम्हाला अंगाला खाज येणे, त्वचेवर पुरळ उठणे, पायांवर खरूज, नायटा होणे, त्वचा कोरडी आणि रूक्ष होणे अशा समस्या निर्माण होतात.

यासाठीच पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. शिवाय यासाठी त्वचेची काळजी घेणारी सर्वात्तम उत्पादने वापरणं नक्कीच योग्य ठरेल.