पिंपल्स समस्या

pimples 1पिंपल्सना अटकावमुरुमांची समस्या अनेकांसाठी त्रासदायक ठरते. वास्तविक पौगंडावस्थेत मुरुमे म्हणजेच पिंपल्स येणं नैसर्गिक आहे. या वयात होणार्‍या संप्रेरकांमधील बदलामुळे हा त्रास संभवतो. मात्र हा काळ उलटल्यानंतरही पिंपल्सचा त्रास होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. प्रौढावस्थेत पिंपल्स येण्याची काही कारणं आहेत. त्वचेचा वाढलेला तेलकटपणा, अस्वच्छता, संप्रेरकांचा असमतोल, अस्वच्छ जागेतील वावर, नित्याची जागरणे, तेलकट तळकट पदार्थांचं अतिरेकी सेवन आणि दुर्लक्षित राहणार्‍या पोटाच्या तक्रारी आदी कारणांमुळे पिंपल्स येतात. म्हणूनच काही उपाय योजायला हवेत. पिंपल्स टाळण्यासाठी दिवसाभरातून चार-पाच वेळा चेहरा स्वच्छ धुवा. पुरेशी झोप घेणंदेखील तितकंच गरजेचं आहे. बाहेरचं अन्न तसेच फास्टफूड टाळा. तेलकट पदार्थांचं अतिरेकी सेवन टाळा. बाहेर पडताना सनस्क्रीन लोशन अवश्य वापरा. क्लिझिंग मिल्कनं चेहरा स्वच्छ करण्याची सवय ठेवल्यास त्वचारंध्रांमध्ये अडकलेली घाण निघून पिंपल्सला अटकाव होऊ शकतो.