पुढील आठवड्यात निवडणुकांची घोषणा
|
निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाना या दोन्ही राज्यांत होणाऱ्या निवडणुकांच्या तारखा जवळपास निश्चित केल्या आहेत.
त्यांची घोषणा पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत 8 नोव्हेंबरला, तर हरियाना विधानसभेची मुदत 27 ऑक्टोबरला संपणार आहे.
त्यामुळे त्यापूर्वी निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यापाठोपाठ झारखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांत निवडणुका होणार आहेत. झारखंड विधानसभेची 3 जानेवारीला व जम्मू काश्मीर विधानसभेची 19 जानेवारीला मुदत संपणार आहे. गणेश चतुर्थी, दसरा आणि दिवाळी या सणांमुळे निवडणूक आयोगाला तारखा निश्चित करण्यांस उशीर होत आहे.