पुन्हा नव्याने
|एका झाडावर दोन फुले मस्तपैकी डुलत होती.
अस्तिव भिन्न तरी एकसारखी फुलत होती.
फुलाबरोबर त्या झाडेही नशेने झुलत होती
जागेचे हलत नाही तरी हास्याने खुलत होती.
आभाळात दोन पक्षी थवे सुखाने विरहात होते.
क्षितीज दूरवर तरीही आशेनेच पाहत होते.
त्यांना सोबत म्हणून वारेही वेगाने वाहत होते.
अदुश्य असले तरीही अस्तित्वाचे गाणे गात होते .
चारी दिशांना ओसंडून नदी जीवन वाटत होती.
समुद्राला भेटण्यासाठी उत्कंठा तिची दाटत होती.
समुद्रालाही प्रत्येक क्षणी नदी आठवत होती.
स्वताला विसरण्याची तिची सवय खटकत होती.
निसर्गचे चित्र मी उघड्या डोळ्यांनी पाहत होते.
शब्द जमले सूर जुळले नाही तेरी मी गात होते.
आठवणींचे फुले ओंजळीत माझ्या जमवत होते.
मी कधीच शिकले आज पुन्हा नव्याने शिकत होते.
-स्वाती सुरेश पाटील