पृथ्वी शॉ ची कामगिरी म्हणजे नव्या सचिनची चाहूल…..

indexज्या हॅरिस शिल्ड स्पर्धेतील विनोद कांबळीसोबतच्या ६६४ धावांच्या विक्रमी भागीदारीतून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर उदयास आला त्याच हॅरिस शिल्ड एक नवीन सचिन उदयास येऊ पाहत आहेत. चौदा वर्षीय पृथ्वी शॉ ने हॅरिस शिल्ड स्पर्धेत ५४६ धावा धावांचा डोंगर उभा केला आणि एका ‘नव्या’ सचिनची झलक दाखविली. त्याच्या व्यक्तिगत ५४६ धावा ह्या जागतिक स्तरावर सर्वोच्च नसल्या तरीही तिसऱ्या क्रमांकाच्या असून ५०० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा तो पहिलाच शाळकरी क्रिकेटपटू ठरला आहे. असे करतांना त्याने अरमान जाफरच्या ह्याच स्पर्धेतील ४९८ धावांच्या विक्रमालाही मागे टाकले.

शालेय जीवनात हॅरिस शिल्ड स्पर्धा गाजविल्यानंतर रणजी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्वितीय कामगिरी केलेल्या सचिन तेंडूलकरच्या नुकत्याच झालेल्या निवृत्तीनंतर पृथ्वीचा पराक्रम म्हणजे नव्या सचिनची चाहूलच म्हणावी लागेल. त्याचे यश बहरत जावो आणि त्याच्या रूपाने एक चांगला क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटला लाभो ह्याच शुभेच्छा!