पेहराव पारंपरिक , लुक नवा .

diwali-dressesसणांचे दिवस म्हटले की, देवधर्म-पूजाअर्चा, नातेवाईक-मित्रमंडळी यांच्याकडे जाणे येणे आलेच… त्यांच्यासोबतीला असतात विविध रंगांचे पारंपरिक पेहराव… घरातील वडीलधार्‍या व्यक्तींकडून या गोष्टीची पूर्वीपासून जाणीवपूर्वक जपवणूक केली जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत पिढी न् पिढी आपण सर्वजण सण-उत्सव साजरे करत आलो असलो तरी देखील प्रत्येक पिढीतील ट्रेंड हा त्या त्या काळातील तरुणाई जपत असते. सध्याची तरुणाईनेही पारंपरिक पेहरावांना नवा लूक देण्याचा प्रय▪करून धार्मिकतेतही फॅशनचा ट्रेंड जपला जात आहे.सणांच्या दिवशी आजची तरुणाई आपापल्या सोयीचे पेहेराव तयार करून घेतात. त्यात तरुण जीन्स, शॉर्ट शर्ट आणि तरुणी लेगीन्स, कुडतीज, जीन्स या पेहरावांना मोठय़ा प्रमाणात पसंती देत आहेत. पण या सणाच्या निमित्ताने हे पेहराव योग्य वाटत नसल्याने यातील सुवर्णमध्य साधला जात आहे. सध्या पारंपरिक पेहरावांना नव्या रंगात साज चढवून नवीन फॅशन म्हणून बाजारात नव्याने आणले जात आहे. त्यात नवविवाहित तरुणी नऊवारी साडीला पसंती देत आहेत. ठसकेबाज नऊवारी, त्यावर नथ आणि अंगावर भरगच्च दागिने यातील आनंद वेगळाच असल्याने नऊवारी साडी नेसून दिवसभर ठेवणे आजच्या तरुणींना अशक्य वाटत असते. त्सामुळे सध्याच्या तरुणी शिवलेली नऊवारी साडी नेसतात. जसे की, एखादी जीन्स किंवा लेगीन्स घातल्याप्रमाणे शिवलेली नऊवारी साडी घालणे खूपच सोपं झालेले आहे. नऊवारी साडी शिवून मिळेल अशा प्रकारच्या पाट्या ठिकठिकाणी टेलरच्या दुकांनासमोर लावलेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. इतक्या प्रमाणात या गोष्टीकडे तरुणाईचा कल वाढलेला दिसत आहे. अगदीच नऊवारी साडी नको असेल, तर येवल्याच्या पैठणीची महिलावर्गाला असलेली आवड लक्षात घेऊन तरुणींसाठी पैठणीचे टॉप बाजारात विकण्यासाठी दाखल झालेले आहेत.जीन्सवर किंवा लेगीन्सवर पैठणीचे टॉप खुलून दिसत असल्याने या टॉपला तरुणींकडून पसंती मिळत आहे. त्यात लाल, पिवळया, निळया अशा रंगाबरोबरच पैठणीचे बेलबुट्टी, मोर, कोयरी या डिझाइन्सने पारंपरिकतेकडे तरूणाईचा कलही टिकून राहत असल्याने त्याला नवा लुकही दिला जात आहे. तसेच फॅशनच्या ट्रेंडमध्ये तरुण मागे नसून, तरुणांचा सगळय़ात आवडता कपड्यांचा प्रकार म्हणजे टी शर्ट होय. टी शर्टला पारंपरिक बनविण्याच्या फंड्याकडे तरुणांना अधिक प्रमाणात आकर्षण निर्माण झाले आहे.