पैंजण

payalमहिलांच्या सोळा शृंगारातील आवडता दागिना म्हणजे पैंजण होय. लहानांपासून मोठय़ा मुली व महिलावर्गाला सगळ्यांना हा प्रकार खूप आवडतो. ग्रामीण भागात यालाच तोडे असेही म्हणतात. हिंदू धर्मात या दागिन्याला विशेष महत्त्व असून, प्रतिष्ठाआहे. पैंजणमध्ये बदलत्या काळानुसार वेगवेगळे प्रकार आले आहेत.

मुली जीन्सवर चांदीचे पैंजण घालू शकत नाही व घातले तर ते नाजूकही दिसायला हवे. बाजारात पैंजणचे नवीन प्रकार आले आहेत. हॅम्प अँकलेट, शेल अँकलेट, वूडन अँकलेट, प्लास्टिक अँकलेट, स्टोन अँकलेट, ज्यूट अँकलेट, बोन अँकलेट आदी प्रकार बाजारात आले आहेत. हॅम्प अँकलेट हे अँडजेस्ट करून घालायचे असते. त्यात आपण पेंडंट सुद्धा घालू शकतो.  काही पैंजण हे क्रिस्टल, मोती, लोकरपासून सुद्धा बनवले आहेत. म्हणून मुली आता जीन्सवरही अँकलेट घालू शकतात. उलट आजकाल तर अँकलेट जीन्सवर घालणे ही फॅशन झाली आहे. यामुळे पायाचा लूकही नाजूक वाटतो. महिलांसाठी ही चांदीचे पैंजण व क्रिस्टल, डायमंड असे प्रकार आले आहेत. बहुतांश महिलांना नाजूक पैंजणपेक्षाही झुमझुम वाजणारे नाजूक घुंगरु असणारे पैजण आवडतात.