पोट्याटो पनीर पीस बॉल
|१) अर्धा किलो बटाटे उकडून
२) शंभर ग्रॅम पनीर
३) चीजचे दोन तुकडे किसून
४) अर्धी वाटी वाफवलेले मटार
५) दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर
६) दोन चमचे वाटलेली हिरवी मिरची
७) चमचाभर जिरंपूड
८) अर्धी वाटी मैदा
९) तळण्यासाठी तेल
१०) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) उकडलेले बटाटे सोलून कुस्करावेत . त्यात किसलेलं चीज , पनीर कुस्करून मिसळावं .
२) तसंच मिरची पेस्ट , कॉर्न फ्लॉवर , जिरं पूड , मटार , मीठ घालावं . या मिश्रणाचे लिंबाहून छोटे गोळे करावेत .
३) मैदयात थोडं मीठ घालून त्याचा पातळसर घोळ बनवावा . बॉल्स त्यात बुडवून मध्यम आचेवर तळावेत . सॉसबरोबर गरमगरम खायला दयावेत .