पोर्टब्लेयर महानगरपालिका मांडणार परमवीरांची गाथा स्मारक रूपाने…..

param-vir-chakraभारताचाच भाग असलेला मात्र भारताच्या मुख्य भूमीपासून काहीसा दूरवर बंगालच्या उपसागरात असलेला अंदमान-निकोबार बेटांचा प्रदेश. ह्या प्रदेशाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेयर च्या महानगर पालिकेने भारताच्या स्वातंत्र्यरक्षणासाठी प्राणपणाने लढलेल्या परमवीर चक्र प्राप्त सैनिकांचे एक भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. ह्या स्माराकाद्वारे त्या परमवीरांच्या शौर्याची गाथा अंदमान-निकोबार भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसमोर ह्या स्मारकाच्या माध्यमातून मांडण्यात येईल. त्याकरीता परमवीर चक्र प्राप्त सैनिकांचे छायाचित्र आणि माहिती मागविण्याचे काम पोर्टब्लेयर महापालिकेने सुरु केले आहे.

हे स्मारक लष्कर संबंधित भारतातील सर्वांत मोठे स्मारक असेल अशी माहितीही पोर्टब्लेयर महापालिकेने दिली आहे. हे स्मारक म्हणजे अंदमान निकोबारला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचे एक नवीन केंद्रच असेल.