पोहे चिवडा
|१) पाव किलो पातळ पोहे
२) एक पळी तेल , शेंगदाणे
३) पाच-सहा हिरव्या मिरच्या वाटून
४) डाळ प्रत्येकी अर्धी वाटी
५) एक चमचा तीळ
६) धने पूड – जिरे पूड प्रत्येकी एक चमचा
७) एक इंच आलं किसून
८) कढीलिंबाची पानं दहा-बारा
९) फोडणीच साहित्य
१०) चमचाभर पिठीसाखर
११) चवीनुसार मीठ .
कृती :-
१) पोहे उन्हात शेकून किंवा मंद आचेवर भाजून घ्यावेत . एक पळी तेलाची मोहरी , हिंग , हळद , कढीलिंब घालून फोडणी करावी .
२) गैस बंद करून फोडणीत वाटलेली मिरची , शेंगदाणे , डाळं , तीळ घालावे . पोहे घालून ढवळावे .
३) मग मीठ , पिठीसाखर , धने-जिरे पूड घालून परत ढवळावे . वरून अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालावा .