प्रिय माझे गाव

डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात
नदीकिनारी देवळाच्या पायाशी आहे माझे प्रिय गाव .

बघाल तर खरंच पडाल प्रेमात राव.

झाडांचे शुद्ध हवा गार गार वारा
पक्ष्यांची किलबिल निसर्गाचा ठेवा राणीचा रानमेवा.

नदीचा खट्याळ प्रवाह मन करील साफ
जंगलचर सोबतीला येथील माझा प्रिय गाव दर्शन देईल.

माझा गाव प्रदूषण मुक्त गावकऱ्यांची वस्ती प्रेमयुक्त
भांडण तंटा मुक्त गाव बघाल तर खरंच पडाल प्रेमात राव.

चिंचवली चांदेवाडी गावाचं नाव
महाराष्ट्र राज्य जिल्हा रत्नागिरी तहसील खेड नदी जगबुडी तीरी..

कवी – चंद्रकांत गोविंद चांदे उर्फ पवार