प्रेमपत्र हरवलं आहे…
|

त्यामुळे तरूणांच संपुर्ण व्यक्तिमत्वच global झालेलं आढळून येत.
शिवाय आधुनिकतेच्या ह्या बदलामुळे क्लासिक बाबी लोप पावत चालल्या आहेत,त्यामधील एक गोष्ट म्हणजे “प्रेमपत्र “
बऱ्याच दिवसानंतर हा शब्द आपल्याही वाचनात आला असेल,प्रेम ह्या अडीच अक्षरात जग जिंकण्याइतकं सामर्थ्य असत असं प्रेमकवी म्हणत असतात.
मात्र ह्या प्रेमाची खोली ज्या मध्यामातुनी आढळून येते ते म्हणजे प्रेमपत्र .
लिखे जो खत तुझे वोह तेरी याद मे … हे गीत आजही ऐकतांना आपल्या जुन्या प्रेमाची आठवण ,मनाला ताजी करून जात असते.
आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या चिठ्ठ्या,आपल्या प्रियकराला किव्हा प्रेयसीला दिलं जाणार प्रेमाचं पत्र जे वाचून मनाला त्या व्यक्तीचा स्पर्श अलगद व्हायचा।
पण हल्ली smartphone,facebook,whatsapp च्या जमान्यात माणूस नेहमी update राहतो त्यामुळे online च्या ह्या विळख्यात प्रेमपात्राला कुठेही थारा मिळत नाही.
chatting च्या प्रभावी सोयीमुळे प्रेम पत्राची गरज राहत नाही. त्यामुळे प्रेमपत्र हरवलं आहे.
मित्रांनो एक काळ होता जेव्हा प्रेम पत्राची वाट पाहण्यात माणुस चलबिचल व्हायचा,आता मात्र regular updat मुळे ह्या लेखीव पत्राला कवडीचीही किंमत प्रेमियुगल देत नाहीत.
प्रेमपत्र वाचतांना पत्रात दिसणारा प्रियकराचा चेहरा,त्याच्या आसवांनी ओला झालेला तो कागद,पहिल्या ओळीत लिहिलेली ती प्रेमाची चारोळी,तो प्रेमाचा सुगंध आता मात्र लुप्त झाली आहे …… कारण प्रेमपत्र हरवलं आहे.
One Comment
nice