प्रेमातच अधिक हरलोय मी ..
|प्रेमात तुझ्या पडून सखे , वाटायचा जीवनात तरलोय मी,
पण मन तुझ्या ताब्यात देऊनही प्रेमातच अधिक हरलोय मी .
प्रेमातच पडल्यानंतर वाटायच प्रेमामुळे अधिक बहारलोय मी ,
पण प्रेमात पडल्यानंतरच सखे , तुझ्यासाठी क्षण अन क्षण झुरालोय मी .
माझी इतकीच अपेक्षा होती की , तू माझी जीवनभर साथ द्यावीस
पण स्वप्नात असा विचार केला नव्हता , कि एक दिवस तू
माझ्या प्रेमाला मात द्याविस.
तू जर काळजाच्या शेवटच्या टोकापासून विचार केला असतास ,
तर तुला माझ नितळ प्रेम दिसल असत ,
तू जर असा विचार केला असतास , तर तुलाही कधीच माझी
साथ सोडावास वाटल नसत .
तुझ्या प्रेमात पडून सखे , तुझ्यासाठी खूप खूप तडफडलोय मी,
अन तुझ्याकडे येतानाच सखे , पुनः पुन्हा धडपडलोय मी .
प्रेमाच्या वाटेवर येणाऱ्या धोंड्यांना तुडवत तुडवत यायचो मी ,
पण याच वाटेवर चालतांना सखे , आपल्यापासुनच दुरावायचो मी.
तुझ्या आठवनीन सखे , खूप खूप रडलोय मी ,
तुझ्या आठवणीसाठी सखे , स्वतःच्या मनाशी झगडलोय मी .
पुनःपुन्हा हृदय विचारतय माझं , तू कधीतरी माझा विचार करशील का ,
माझी आयुष्यभर साथ देण्यासाठी , तू कधीतरी माझा हात धरशील का .
आईच प्रेम अनुभवलं मी , बाबांची प्रेम अनुभवलंय ,
पण माझ्या आंतरिक भावनांना अजून सखे , कोणीच नाही समजू शकलय.
कुणीतरी मला समजून घ्यावं , याच आशेन जगतोय मी ,
ती समजून घेणारी तुच असावीस , यासाठी तुझीच वाट बघतोय मी .
प्रेमात तुझ्या पडून सखे , पुनःपुन्हा झगडलोय मी ,
मन तुझ्या ताब्यात देऊनही , प्रेमातच अधिक हरलोय मी ,
मन तुझ्या ताब्यात देऊनही , प्रेमातच अधिक हरलोय मी.
– भूषण साहेबराव सावळा