प्रेमासाठी
|व्हॅलेंटाईन डे च्या दिवसी गेलो तिला घरी घेवून
व्हॅलेंटाईन डे च्या दिवसी गेलो तिला घरी घेवून
आई तुझी सून इनकमिंग सून
आई म्हणाली ,
आई म्हणाली ईला कुठून आणली रे उचलून ……
आईला म्हटलं दोघे कॉलेजात शिकत होतो.
तितक्यात सारी
पोर आम्ही एकमेकांकड बघत होतो .
अग,अग मलाच कळल नाही अस विपरीत कस घडल
आमच दोघाच जीवन अस कस जुळल .
आई म्हणाली, आई म्हणाली ईला चुल्यावरतो भाकरी करता येईल का?
आणि चटके घेता घेता संसार करता येईल का ?
सांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का ?
डोळ्यात जाईल धूर तुझ्या आईबाप होतील दूर
डोळ्यात जाईल धूर तुझ्या आईबाप होतील दूर
गोऱ्या तुझ्या गालावरती रंग काळा शोभून दिसेल का ?
सांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का ?
उपाशी पोटी राहत लागल घरात कधी कधी
उन वारा पाणी पाऊस तुला साहता येईल का ?
सांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का ?
काटा कुटा वेचून लेका भरवलाय मी घास
असाच मायेचा घास करून त्याच पोट भारवाशील का ?
सांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का ?
अस असेल तर आत्ताच घरी जा सांग तुझ्या बापाला
समोरच्या झोपडपट्टीत वरात येतय बंगल्यात
झोपडपट्टीची वरात या बंगल्याला सहन होईल का ?
सांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का ?