प्रेम प्रकरण

loveतुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा

जमा खर्च एवढा पाहून जा

तू मला दिलेलं सगळ घेवून जा

मी तुला दिलेलं सगळ देवून जा

 

हॉटेल मध्ये कित्येकदा खाल्ले

आपण पाणी पुरी पावभाजी सामोसे

आत्ता पर्यंत नेहमीच भरत आलो

बिलाचे सर्व पैसे

 

आज अखेरचे जाऊ

पोटभर पाव भाजी खाऊ

किमान या बिलाचे पैसे

तेरी भरून जा .

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा …………..

 

लेक्चर बुडवून मी फर्स्ट शो च

Advance booking cinema ला करायचो

अन आठवड्याला एक तरी नाटक दाखवायचो

नाटकाचे माफ करतो .मात्र

सिनेमाच्या तिकिटाचे पैसे तरी देवून जा

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा …………..

 

आपल हे प्रेम प्रकरण

तुझ्या पहिलवान भावाला कळल जेव्हा

एवढ बेदम ठोकळ मला

मी मारता मारता वाचलो तेव्हा

चार दिवस दवाखान्यात

पंधरा दिवस अंथरून पडून होतो .

 

भावाच्या वतीने तू माझी

माफी

मागून जा

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा ………………

मी कुठून तरी नोट्स मिळवायचो

परीक्षेच्या काळात मात्र तुलाच दयायचो

मग तुला नेहमी  फर्स्ट क्लास मिळयचा

 

माझा मात्र एक तरी back luck रहायचा

म्हणून माझ्या notes मला परत देवून जा

तुझ्या माझ्या प्रेम प्रकरणाचा

जमा खर्च एवढा पाहून जा

तुला मला दिलेलं सगळ  घेवून जा !!

मी तुला दिलेलं सगळ  घेवून जा !