प्रेम -ब्रेम

RadheKrishnaप्रेम -ब्रेम

प्रेम- ब्रेम ते काही नसते
क्षणिक सारेच नाटक असते

दोघांचाही स्वार्थ असते
बदनाम ते त्यागा करते

हृदयाशी उगा बंध
जोडते
मेंदूलाही कमी लेखते
स्वप्नांचेच इमले रचते
कित्येकांस खड्ड्यात घालते

काहीना ते पळा सांगते
कित्येकांस तर पंगुच करते
काहीना ते
राजा करते
कित्येकांस भिक्षू करून सोडते

काहीना ते वेडे करते

कित्येकांस ते स्वर्गी धाडते
खुल्यासही ते मोठे
करते
धारेवर त्या ईश्वरा धरते

तरी जगी ते फुलतच असते
कित्येकांस ते
झुलवत असते
जिवनात मजा घोळत असते
अश्रुना गुलाम करत असते

कवी –
निलेश बामणे

2 Comments