प्रेम हरवलं आहे…….!

ते दिवस केव्हाच गेले,जेव्हा नीतिमत्तेच उद्दातीकरण व्हायचं प्रेम ह्या व्यापक संकल्पनेमध्ये उभ आयुष्य निघून जायचं,कुणीतरी आपल आहे ह्या भावनेन मन वेड आनंदुन उठायचं,ती येणार म्हणून तिच्या वाटेला हेच मन वेड डोळे लाऊन बसायचं.आता मात्र संयमाचा बांध तुटून गेला.मुखातुनी वासनेचा शब्द सुटून गेला,आणि भरलेला मैफिलीतून प्रेमाचा अर्थ निघून गेला.आता राहिलं ते फक्त सौंदर्य,राहिला तो फक्त करार तो आणि त्याच्यातली ती दोघांपैकी कुणीच उरलं नाही.राहिला तो फक्त नर आणि मादी ह्या दोघांच्या संमतीचा प्रौडखेळ.

आकर्षण प्रकर्षण झालं,संमती विकृती झाली,नात्यांमध्ये करार झाला,आणि प्रत्येकाच्या नशिबात असूनही प्रेमाच्या पाठीशी पोरकेपणा आला.

“कुणी घातला घाव,कुणी मांडला डाव”

हे सांर काही कळत होते,

मी जळतांना हसणारे आज मी हसतांना जळत होते “

आजकाल तरुण असूनही SINGLE असणे,हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते.आपल्याला दोन चार गर्ल फ्रेंड किंव्हा बॉय फ्रेंड असण ह्याला हल्ली प्रतिष्ठा समजली जाते.नुसत्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी प्रेमाचा अट्टाहास म्हणजे सामाजिक विकृतीच आहे अस म्हणल तरी वावग ठरणार नाही.मात्र रामाच्या भेटीसाठी उभं आयुषच वेचणार्या शबरीच प्रेम,कृष्णासाठी विषाचा प्याला पिणाऱ्या मीरेच प्रेम,समाजिक कटूतेत मृत्युमुखी झालेल्या ह्या प्रेमाची महती कधीही कमी होणार नाही.भले काळ कितीही आधुनिक होवो.म्हणूनच कुसुमाग्रज म्हणतात….”प्रेम कर भिल्लासारख बाणावरती खोचलेलं,मातीमध्ये उगवून देखील,आभाळापर्यंत पोचलेलं”

त्यामुळे एक कवी खूप सुंदर शब्दात सांगतो”

प्रेमा” अरे वेड्या

कुणाच्या आयुष्यात तु एवढा का रुजून जातोस ?

धोके देतात मानस एकमेकांना,

आणि उगाचच तु बदनाम होतोस “