फणसाच्या गऱ्यांची भाजी

jackfruit curry

साहित्य :-

१)      जून फणस एक (कापा किंवा बरका)

२)     तिखट , मसाला मीठ , गुळ

३)     लाल मिरच्या एक-दोन

४)     ओलं खोबरं .

कृती :-

१)      फणस कापून गरे व आठळ्या सोलून घ्याव्यात .  गरे फोडून त्याचे दोन भाग  करावेत .  आठळ्या ठेचून त्यांची सालं काढून त्या पाण्यात टाकाव्यात .

२)     खळखळून धुवून घ्याव्यात .  नंतर त्या कुकरमध्ये उकडून उकडून घ्याव्यात .  आठळीवर टरफल राहू देऊ नये .

३)     थोडी जास्त तेलाची फोडणी करावी .  गरे फोडणीला टाकून पाण्याचा हबका मारावा .

४)     चांगले वाफवले की आठळ्या , मीठ गुळ घालून फडक्यानं पातेल्यातले गरे हासडावेत (म्हणजे वर-खाली हलवावेत .)

५)    ओलं खोबरं घालावं .  फोडणीत लाल मिरच्यांचे तुकडे टाकावेत .  ते जास्त खमंग लागतात .  या भाजीला ‘गोडा मसाला’ व ‘वेसवार’ घालण्याची कोकणात पद्धत आहे .