फॅशनेबल राहायचे तर..

fashionप्रत्येक फॅशन आपल्यावर सूट होईलच असे नाही. रंग, रूप, बांधा, वय या सर्व बाबी लक्षात घेऊनच फॅशन अंगीकारायला हवी.

उंची चांगली असल्यास कुठल्याही फॅशनचे कपडे खुलून दिसतात. मात्र उंची कमी असेल तर थोडी काळजी घ्यायला हवी. अशा लोकांना बोल्ड प्रिंटचे कपडे वापरणं टाळावं. उंची कमी असल्यास व्ही नेकलाईनचे कपडे चांगले दिसतात. शरीरयष्टी सडसडीत असल्यास गडद रंगाचे कपडे चांगले दिसतात. व्यवसायानुसारही कपड्यांची निवड केली जावी.

ऑफिसमध्ये जाणार्‍या महिलांनी कॉर्पोरेट ड्रेसिंग सेन्स लक्षात घेऊन कपडे वापरावे.ऑफिसमध्ये गडद रंगाचे कपडे वापरणं टाळावं, त्याचप्रमाणे अंगप्रदर्शन करणारे कपडे टाळावे. खूप जास्त कलाकुसर असणारे अथवा घुंगरू, टिकल्या, गडद रंगाचे मणी, आरसे यांची सजावट असलेले कपडे टाळावे.

गृहिणींना देखील प्रावरणं निवडताना काळजी घ्यायला हवी. अलीकडे पारंपरिक साडीला अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्री-स्टिच्ड साडी, गाऊन साडी वापरून पाहायला हरकत नाही.