फोडशीची भाजी
|साहित्य :–
१) फोडशीच्या पात्या एक जुडी
२) डाळीचं पीठ चार चमचे
३) ओलं खोबरं
४) तिखट , मीठ
५) गुळ , तेल
६) फोडणीचं साहित्य .
कृती :-
१) फोडशीची भाजी स्वच्छ धुवून चिरावी . फोडणीला टाकावी .
२) वाफवली की चवीला मीठ , तिखट , गुळ टाकावा .
३) ते नीट शिजलं की डाळीचं पीठ वरून भुरभुरावं व वाफ येऊ दयावी .
४) थोडं ओलं खोबरं घालावं .