बंद होणार टाईपरायटरची टक-टक…..

typewriter5_ArticleThumb200_05092013_130926    ‘परिस्थिती माणसाला बदलण्यास भाग पाडते’ असे म्हटले जाते ते खरेच आहे. याचा प्रत्यय प्रत्येकालाच नेहमी येत असतो. म्हणूनच परिस्थितीनुरूप शासकीय कार्यालये, शासकीय नियम आणि कार्यपद्धतीही बदलतात. पूर्वी कुठल्याही सरकारी कार्यालयात ‘टाईपरायटर’चा खडखडाट हमखास ऐकू यायचा. त्यावेळी आज वापरला जातो तसा संगणक नव्हता. सरकारी कार्यालयात ‘लिपिक’ ह्या पदासाठी टाईपरायटरचे शिक्षण घेतल्याशिवाय नोकरी मिळत नव्हती. तशी आताच असायची आणि आजही ती आहे. आता मात्र २०१५ सालापासून हि अट काढून टाकण्यात येणार असून शासकीय कार्यालयातूनही टाईपरायटर हद्दपार होणार आहे. टाईपिंगचे सर्व काम संगणकावरूनच केले जाईल. टायपिंगची परीक्षा देखील आता संगणकावरूनच घेतली जाणार आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत ‘संगणक टंकलेखन अभ्यासक्रम’ हि नवीन परीक्षा घेण्यात येणार असून हि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे.

7 Comments