बटाटेवडा
|साहित्य :-
१) बटाटे अर्धा किलो
२) बेसन पीठ हवे तेवढे
३) आले-लसूण पेस्ट दोन चमचे
४) कोथिंबीर बारीक चिरून एक वाटी
५) उडीदडाळ दोन चमचे
६) अर्धा चमचा खायचा सोडा
७) हिरव्या मिरच्या आठ ते दहा
८) तळण्यासाठी तेल
९) चवीपुरते मीठ .
कृती :-
१) प्रथम कढाईत तेल गरम करून त्यात मोहरी , आले व लसूण पेस्ट टाकावी .
२) मिरची बारीक वाटून टाकावी . नंतर त्यात उडीदडाळ व हळद टाकून उकडून बारीक केलेला बटाटा टाकावा .
३) मीठ चवीनुसार टाकून वरून चिरलेली कोथिंबीर टाकावी . तयार झालेल्या मिश्रणाचे लहान चपटे गोळे करावेत .
४) बेसन पिठात सोडा , हळद व ओवा टाकून ते सरसरीत भिजवावे . त्यात वरील गोळे बुडवून सोनेरी रंग होईपर्यंत तळावेत .