बदाम-सुजीचा हलवा
|१) एक वाटी जाडसर रवा (सुजी)
२) अर्धी वाटी तूप
३) एक वाटी दुध
४) अडीच वाटी साखर
५) अडीच वाटी बदाम (बदाम ब्लांच करून त्याचे तुकडे करावेत)
६) दीड चमचे वेलचीपूड
७) केशरच्या काही काडया .
कृती :-
१) कढाई तापवून त्यात रवा भाजून घ्यावा . बदाम ब्लांच करून पुसून घ्यावेत .
२) त्याची सालं काढावीत आणि मिक्सरवर त्याची जाडसर पूड करावी .
३) कढाईत तूप गरम करून त्यात ही बदामाची पूड लालसर सोनेरी रंगावर परतावी .
४) त्यात भाजलेला रवा घालून नीट ढवळावा . त्यावर साखर आणि नंतर दुध घालून हे मिश्रण नीट मिसळून एकजीव करावं .
५) वरती झाकण ठेवून थोडा वेळ शिजू दयावं . एक-दोन दणदणीत वाफा काढल्यावर त्यात केशर मिसळून हलवा .
६) थलथलीत होईपर्यंत शिजवावा . वरून वेलचीपूड घालून हलवा नीट एकत्र करावं . खायला देताना वरून थोडं तूप सोडून गरम गरम वाढावा .