बर्थ-डे सेलिब्रेशनमधील बदल
|वाढदिवस हा कोणाच्याही आयुष्यातील एक असा दिवस असतो, जो कोणत्याही व्यक्तीला एक दिवस का होईना स्पेशल बनवतो. मग या दिवशी येणारे विशिंगकॉल्स, बर्थ-डे मेसेजेस, मोठय़ांचे आशीर्वाद, गिफ्ट्स, सरप्राइज बर्थ-डे पार्टीज हे सर्व होतेच. फारच कमी लोक असतील ज्यांना बर्थ-डे सेलिब्रेट करायला आवडत नसेल, पण त्या दिवशी प्रत्येकाला होणारे फिलिंग वेगळेच असते. लहानपणीपासून आपले वाढदिवस खूप वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होत आले आहेत. काळ बदलला तसे वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्येसुद्धा बदल होत आले आहेत. त्यातच तरुणाई म्हटली की, मित्र- मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी वेगवेगळे प्लॅनिंग, सरप्राइजेस आलेच. नेहमी फ्रेंड्सच्या वाढदिवसासाठी वेगवेगळी सरप्राइज पार्टी प्लॅन करणे ही तरुणाईची एक वेगळीच क्रिएटिव्हिटी असते.
आजकाल फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअँपमुळे स्वतंत्र भेटून किंवा फोन करून विश करणे फारच कमी झाले आहे, पण फ्रेंड्सच्या बर्थ-डेसाठी लेट नाइट पार्टीज ऑर्गनाइज करणारेसुद्धा कमी नाहीत. फ्रेंडच्या बर्थ-डेला रात्री १२ वाजता ग्रूप कॉन्फरन्सवर फोन करून किंवा ग्रूपने केक घेऊन मित्राच्या घरी रात्री १२ वाजता जाणे यात आता काही नवीन राहिलेले नाही. वाढदिवसाला कोणत्याही वेळी फ्रेंड्स केक घेऊन घरी टपकतात आणि मग जी दंगा-मस्ती आणि पार्टी होते, ती कोणत्याही बिग बॅशपेक्षा कमी नसते, पण यापेक्षाही सर्वात धमाल बर्थ-डेज कॉलेजमध्ये सेलिब्रेट होतात, असे तरुणाईचे म्हणणे आहे. कॅटीन किंवा एखाद्या रिकाम्या वर्गात डेकोरेशन करून बर्थ-डे बॉय/गर्लला आणले जाते आणि बर्थ-डे सॉँग म्हणून केक कापला जातो आणि मग मस्तपैकी पार्टी उकळली जाते. ऑफिसमध्येसुद्धा आजकाल बर्थ-डे सरप्राइज ट्रेंड रुजू लागला आहे. ऑफिस कलिग्ज मिळून स्पेशल पार्टी ऑर्गनाइज करतात.