बळीराजा

m- farmerअस्मानी जाईल

तर सुलतानी खाईल

तहसिलीतून  सुटशील

तर कोर्टात अडकशील

 

जनावरान सोडलं तर

माणस फाडतील

टाकाच्या निफानी

तुझी कणस खुडतील

 

ढोरांच्या गळ्यात

गळा घाल

अन मनसोक्त रडून घे

तुझ्या पाठीवर चित्र

कुनाकुणाच्या बुटांच आहे

त्यांनाच विचारून घे

 

थांब थांब राजा

माझ्या बळीराजा

असा नाराज नको होऊ

आपल्याच विहिरीत

जीव नको देवू

अशी  व्यवस्था वरतीच

ठरली आहे बाबा

 

पाणी पाणी म्हणत तू

उन्हात डोळे पांढरे करशील

तरीही ना मरशील

तर धो धो पडेल पाऊस

अन पुरात वाहून जाशील………….