बाप……..

baapसंकटांना झेलत, कुटुंबाला पेलत

वाट कधीच चुकत नाही

का ठाऊक कुणास कसा

बाप कधी कळत नाही

आयुष्यात बापाचं महत्व अनन्य साधारण आहे,आईच वात्सल्य जगाला दिसत मात्र बापाचं अनामिक शिस्तप्रिय प्रेम दुर्लक्षित राहत….

आपल्या कुटुंबाला एका सूत्रात बांधून ठेवण, आपल्या पाल्यांच्या भविष्याची तरतूद करण, त्यांच्या  उदरनिर्वाहाची काळजी कारण त्यासाठी दिवस रात्र झटत राहाण ह्यांसारखी कित्तेक कर्तव्ये एकता बाप निभावत असतो. आपल पाल्य  शिकून मोठ व्हाव,समाजात नावलौकिक व्हाव, अस स्वप्न प्रत्येक बाप उराशी बाळगत असतो. थोडा कठोर वागतो,रागावतो,चिडतो,मारतो मात्र परिवारासाठी एखाद्या बुरुज सारखा उभा राहतो तो बाप असतो.

प्रत्येक गरजआपल्या पुरविण्यासाठी स्वत फटका राहतो. त्यामुळे वडिलांची महती खूप अवर्णीय आहे. आज सर्वत्र आईचे गोडावी गाणारी दिसतात मात्र बाप मात्र दुर्लक्षित राहतो.  .ज्याने  हात धरून दुनियादारी दाखविली त्याच्याशी विन्मुख राहू नका,आपला बाप अडाणी आहे त्याला जगाच ज्ञान नाही अस समजू नका,त्याला सर्व कळत असत मात्र जबाबदारीच ओझ त्याला व्यक्त होऊ देत नाही. त्यामुळे बाप हा शेवटी बापाचं असतो,आम्ही सलाम करतो त्या पितृत्वाला

2 Comments