बाळापूर किल्ला

हा किल्ला 1721 साली आझम खान याने बांधण्यास घेतला. आझम खान हा औरंगजेब याचा पुत्र होता. या किल्ल्याचं काम इस्माईल खान याने 1757 मध्ये पूर्ण केले.

इस्माईल खान याला एलाईचपूरचा नवाब या नावाने ओळखलं जातं. मान आणि महिषी या नद्यांच्या संगमावर असलेल्या छोट्याशा उंचवट्यावर बाळापूरचा प्रसिद्ध किल्ला बांधलेला आहे.

बाळापूरच्या किल्ल्याला दुहेरी बांधणीची भक्कम तटबंदी असून या तटबंदीला जागोजागी बलदंड बुरूज बांधून संरक्षण करण्यात आले आहे.

बाळापूर गावाच्या दक्षिणेकडील नदीच्या काठी मोगली सरदार मिर्झाराजे जयसिंग यांनी बांधलेली छत्री असून त्यांनी ही छत्री आपल्या घोड्याच्या आठवणीत बांधल्याचं म्हटलं जातं.

बाळापूरच्या किल्ल्याला भेट देण्यास गेल्यास ही छत्री आवर्जून पहावी. या किल्ल्याला 29 ऑगस्ट 1992 या दिवशी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलं आहे.स्थळ: अकोला 

भेट देण्याची वेळ: सकाळी 9 ते संध्याकाळी 6

कसं पोचाल: येथे जाण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन म्हणजे अकोला होय.