बा विठोबा सुटलास बाबा तु……..

v
“पिंडीवरी विंचू बैसला देवपूजा नावडे त्याला”
ह्या तुकोबांच्या अभंगाची खरी ओळख वारंवार वारकऱ्यांना होत होती,आपल्या देवाची आपण पूजा करू शकत नाहीत याची शल्ये त्यांना नेहमी टोचत असे.आता मात्र विठल मंदिरात इतिहासचं घडला अनेक वर्षांपासून बडव्यांनी आणि अत्पातांनी जखडून ठेवलेला पांडुरंग अखेर मुक्त झाला.ज्या बहुजनांनी विठ्ठलाला आपली माऊली मानलं आहे त्यांनाच पूजेचा अधिकार नव्हता….सनातनी वर्णवर्चस्वाने पंढरीसकट विठ्ठलावर आणि त्याच्या संपत्तीवर आपला अधिकार गाजवला होता,मात्र अनेक वर्षांच्या संघर्षातून अखेर विठू ह्या जाचातून मुक्त झाला. आणि आपल्या लाडक्या लेकरांना पूजेचा अधिकार मिळाला.
पंढरीचा पांडुरंग हे तमाम बहुजनांच अस्मितेच आणि श्रद्धेच प्रतीक आणि दैवत आहे.अनेक संतांनी आणि ह्या महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी आणि शेतकऱ्यांच आराध्य दैवत म्हणजे फक्त विठोबाचं…….,दरवर्षी आषाढी एकादशीला हजारो मैलाची पायी वारी करीत वारकरी विठ्ठल नामघोषात अलंकापुरीत येतात ,चंद्रभागेत स्नान करून उभ्या जन्मचं सार्थक मानत असतात.मात्र गाभार्यात ठाण मांडून बसलेली बडवे मंडळी विठूला जणू आपल्याच मालकीचा मानत होती.वारकर्यांच्या आस्थेला आणि उपवासाला कसलंच महत्त्व नव्हत.मात्र आता २ स्त्रियांचा पुजारी म्हणून आणि बाकीच्या जाती विरहीत पुजाऱ्यांना विठ्ठल पूजेचा मान मिळाला आणि अनेक वर्षापासून वारी करणाऱ्या वारकर्यांच्या श्रद्धेला खर सात्विक स्वरूप आता प्राप्त झालं आहे.