बुद्ध पौर्णिमा

यंदाच्या वर्षी १६ मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे.
ती म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी
बुद्धांचे महानिर्वाण झाले होते, असे सांगितले जाते.
बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते. जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व आणि आर्य सत्य…

बोधगया

बुद्ध पौर्णिमेला बोधगया येथे जगभरातून बौद्ध अनुयायी येतात आणि प्रार्थना करतात.
बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली २ मे १९५० रोजी भारतात पहिली सार्वजनिक बुद्ध जयंती दिल्ली येथे साजरी झाली.
१९५१ मध्ये तीन दिवसीय बुद्ध जयंती महोत्सव साजरा करण्यात आला होता. २७ मे १९५३ रोजी भारत सरकारने बुद्ध जयंतीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.

आर्यसत्य आणि अष्टांगिक मार्ग

करोना काळात आपल्याला बरेच दिवस झाले घरात रहावे लागते आहे. या घरात राहण्याचा कोणी चांगला वापर केला आहे तर कोणी फक्त दुखात हे दिवस काढत आहे.
परंतु बुद्धांनी सांगितलेली चार आर्यसत्य आचरणात आणल्यास माणूस त्याचे जीवन आनंदात घालवू शकतो. ती सत्य म्हणजे, दु:ख असते. दु:खाला कारण असते. दु:खाचे निवारण करता येते.
दु:ख कमी करण्याचे उपाय आहेत. मानवी जीवनातील दु:खे निवारण्यासाठी बुद्धांनी अष्टांगिक मार्ग सांगितले होते. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी.

बुद्ध जयंतीचे महत्त्व

जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले.
यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला.
ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

आरंभीच्या प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता.
या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता.
त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधी (ज्ञान) प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले.
त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे.
या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.
दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते.
एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तू स्वतःला मिळविण्याकरिता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच.
तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले.
ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे.
म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले.

हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास नाही.
तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला.
प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते.
तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, हे स्पष्ट करणारी काहीएक कार्यकारणपरंपरा आहे.
एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.
(म्हणजे मागील जन्म आणि पुढील जन्म असतात. स्वतः गौतम बुद्धाचे अनेक जन्म झाले. त्या जन्मांच्या कथांना जातककथा म्हणतात. अर्थात हे जन्म झाले तेव्हा गौतम हा बुद्ध नव्हता.)

या दिवशी बौद्ध घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात आणि फुलांनी घर सजवले जाते.
बौद्ध धर्माच्या धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण केले जाते.
बुद्ध विहारांमध्ये (बौद्ध मंदिरांमध्ये) आणि घरांमध्ये अगरबत्त्या लावल्या जातात. बुद्ध मूर्तीवर फळ-फूल चढवले जाते. आणि दिवा लावून पूजा केली जाते.
बोधिवृक्षाची पूजा केली जाते.
त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते. वृक्षाच्या भोवती दिवे लावतात.
या दिवशी मांसाहार वर्ज्य असतो.
पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त करून खुल्या आकाशात सोडले जाते.
गरिबांना भोजन व वस्त्र दिले जाते.
बौद्ध अनुयायींना तेथे जाऊन प्रार्थना करता यावी यासाठी दिल्ली येथील बौद्ध संग्रहालयातील बुद्धांच्या अस्थी बाहेर काढून ठेवतात.

बाई बी ‘मानुस’ असती …..?

                                                      ‘ती’  नवी नवेली                                                          डोळ्यातले स्वप्न। ….!                                                        नव्याचे नऊ  दिवस झाले भग्न   ….!                                                        पहिल्याच दिवाळीत                                                       …

Read more