बेसनाचं धिरडं

साहित्य :-besan paratha

१)      एक वाटी बेसन

२)     अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा

३)     एक मोठा चमचा बरीक रवा

४)     अर्धी वाटी पाणी

५)    अर्धी वाटी ताक

६)      अर्धा चमचा लाल तिखट

७)    पाव चमचा ओवा

८)     चिमुटभर सोडा

९)      चवीनुसार मीठ .

कृती :-

१)      धिरडं करण्यासाठी बीडचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा .  सर्व साहित्य   एकजीव करून घ्याव्या . 

२)     तवा तापला की नारळाची शेंडीने तव्याला तेल लावून घ्यावं .  जेणे करून धिरडी चिकटणार नाही .    

३)     एक चमचाभर पीठ घालून पीठ तव्यावर पसरून किंचित तेल सोडून झाकण  ठेवावं .  चर्र आवाज आला की धिरडं उलटावं . 

४)     नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तर थोडं पाणी घाला .  एकदा जमलं की तवाभर धिरडं करता येतं .