बेसन लाडू

besan ladoo

साहित्य :-

१)    एक किलो हरभरा डाळ

२)    एक किलो बारीक साखर

३)    अर्धा किलो तूप

४)    वेलदोडे , जायफळ पूड

५)    बेदाणे व काजू .

कृती :-

१)    डाळ थोडी भाजून दळून आणावी .  तूप गरम करून त्यात दळलेले पीठ टाकून ढवळून घ्यावे .

२)    बदामी रंग येईपर्यंत पीठ भाजावे .  पीठ भाजले की खाली उतरवून थंड करून घ्यावे .

३)    नंतर त्यात बारीक केलेली साखर टाकून एकजीव करावे व वेलदोडे , जायफळ पूड टाकून मिक्स करावे .  लाडू वळताना एखादा बेदाणा किंवा काजु टाकून लाडू तयार करावेत .