ब्लू प्रिंट कधी ?

raju

गेल्या सहा सात वर्षापासून विकासाची ब्लू प्रिंट बनते आहे असे म्हणणारे राज ठाकरे,तोडतो-फोडतो,इंगा दाखवतो अशी जहाळ वक्तव्य करणारे राज ठाकरे,आपल्या विशेष ठाकरी शैलीमुळे प्रसिध्द झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे.

हल्ली मतदारांना भावनिक साद घालतांना दिसत आहेत. नाशिककरांनो, ऋणानुबंध दृढ करु या ! मनसेपासून दुरावलेल्या मतदारांना राज ठाकरे यांनी भावनिक साद घातली आहे.

विधानसभेत तीन आमदार, नाशिक महापालिकेची सत्ता. एवढं असूनही लोकसभा निवडणुकीत मनसेला सपाटून मार खावा लागला.

महापालिकेत सत्ता आल्यानंतर नाशिककरांना दिलेला शब्द पाळण्यात अपयश आल्याने मनसेच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली.

त्यामुळे नाशिककरांशी आपण आणखी संवाद साधण्यावर भर देणार असल्याची भूमिका राज यांनी स्पष्ट केली.

 मात्र विकासाची ब्लू प्रिंट नेमकी कधी प्रदर्शित होईल ह्याकडे लोकांचे लक्ष लागल आहे