भय इथले संपत नाही
|
देशात अराजकता माजते आहे,माणुसकीचा दूरपर्यंत थांग लागत नाही,जो तो फक्त न फक्त स्वतासाठी जगतांना दिसत आहे.
सामाजिक नितीमुल्ले पायंडळी तुडविली जात आहेत,विश्वास ठेवावा असा व्यक्ती हल्ली नामशेष झाला आहे,संस्कार कुचकामी ठरले आहेत.
फक्त पैसा आणि पैसाच आजचा भगवंत झाला आहे.
त्यामुळे समाजात चंगळवाद वाढला आहे,क्षणिक सुखासाठी खटाटोप केल्या जात आहेत त्यातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे,
समाजवाद,जातिवाद,आतंकवाद,दहशतवाद,ह्यांसारख्या वादांमुळे संयमाचा धन्यवाद माणुस विसरला आहे.
एक कवी खूप सुंदर लिहतो कि,
हर वक्त हर शक्स हादसा होनेसे डर रहा है !
हर वक्त हर शक्स हादसा होनेसे डर रहा है !
मां कि गोद में बेठा बच्चा,बडा होनेसे डर रहा हे !
भय इथे पथापथावर आहे,मात्र आता आपल्यालाच धीठ व्हावं लागेल,प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यावं लागेल,आपली सामाजिक नितीमुल्ले,राष्ट्रीय कर्तव्ये बजावली जायला हवीत
तरच कुठेतरी मनावरची हि भीती दूर होईल,नाहीतर भेकड माणसे नेहमी गुलामीत जगत राहतात……
One Comment
Thank you sir ,for marathi aarkshan god bless you.